मळगाव ता.मालेगाव जि.नाशिक
mlggpmalgaon@gmail.com
मळगाव ता.मालेगाव जि.नाशिक
mlggpmalgaon@gmail.com
सुचना :
मळगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे.२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ३०५७ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद १ प्राथमिक शाळा ३ अंगणवाडी केंद्र ४ सामुदायिक सभामंडप ५ पाणीसाठवण सार्वजनिक विहीरी इ.सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावात पंचवटी देवस्थान हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे.गावात इच्छापूर्ती गणेश मंदिर, भवानी माता मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कापूस,कांदा,मका,बाजरी,सोयाबीन गहू व हरभरा हि प्रमुख पिके घेतली जातात मक्का, कापुस व कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते.
मळगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत शेकडो कुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मळगाव हागणदारी मुक्त आहे.गावाच्या हद्दीत गिरणा डॅम हा जलसंधारण प्रकल्प (धरण) बांधण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ९ सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ (हेक्टर मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मळगाव हे गाव आहे.हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून १२० किमी अंतरावर आहे. मालेगाव पासून २२किमी. राज्याची राजधानी मुंबईपासून ३१४ किमी.आहे.गावात पोस्ट ऑफिस आहे.आणि पोस्ट मुख्य कार्यालय मालेगाव येथे आहे.
गिलाने २. (km)मथुरपाडे ७ (km) साकुरी ७ (km) चंदनपुरी १४ (km) निमगाव ७ (km) निमगुले २ (km) हि मळगाव जवळची गावे आहेत.मालेगाव ,नांदगाव हि शहरे मळगाव पासून जवळ आहेत.
मळगाव हे गाव साधे,कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते.शेती हा गावकरींचा मुख्य व्यवसाय असून कांदा.मका,बाजरी,कापुस आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
गावात सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात.वर्षभर साजरे होणारे सन उत्सव ग्राम दैवतांची पूजाअर्चा तसेच वाघदेवाची पूजा हा सन गावाच्या एकात्मतेचे प्रतिक मानले जाते.येथे आदिवासी परंपरा आणि संस्कृती चे जतन केले जाते.होळी,गणेशोत्सव,दिवाळी,नवरात्र हनुमान जयंती यासह देव ह्या स्थानिक देवतांचे (निसर्ग) कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
येथील लोक ‘अतिथी देवो भाव, ह्या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. येथील लोक मेहनती लोक आहेत. तरून पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगती कडे वाटचाल करत आहे. मळगाव लोकजीवनात आदिवासी संस्कृती व पारंपारिक ग्रामीण जीवनमान आढळून यते. मळगाव गावाची विकासाकडे वाटचालीचे कार्य उत्तम असे सुरु आहे.
ग्रामदैवताचे मंदिर:-पंचवटी येथे हनुमान जयंती,आषाढी एकादशी इच्छापूर्ती गणेश मंदिर वर्धापन च्या दिवशी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने पूजा करतात.
मळगाव गावात इच्छापूर्ती गणेश,विठ्ठल रुखमाई ,हनुमानाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे.तसेच ग्रामपंचायत परिसरात येथे भवानी माता मंदिर व भव्य असे भवानी वस्तीची शोभा वाढवतात.व येथे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
हिरवीगार शेती:- मळगाव येथील मक्का,कापूस,कांदा या पिकांसाठी प्रसिद्ध असून येथे पसरलेली हिरवीगार शेती पाहण्यासारखी आहे.शेती हा ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे.
जलसंधारण प्रकल्प:- गावात गिरणा नदीवरील गिरणा डॅम पाणलोट क्षेत्र प्रकल्प हा गावाची शोभा वाढवतो. गिरणा डॅम धरणामुळे गावाच्या शेती व्यवसायाला मोठ मोठ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम करते. गिरणा डॅम धरणाचा शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे.
कसे पोहचावे:-
मळगाव या ठिकाणी येणेसाठी मालेगाव बस आगारातून चंदनपुरी, मळगाव,साकुरी या बसने गावात उतरून आपन मळगाव पर्यंत पोहचू शकतो.नाशिक वरून येताना मालेगाव मार्गे खाजगी/बस वाहनाने आपण मळगाव येथे पोहचू शकतो
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री. सोपान नामदेव सोळुंके
सौ.सखुबाई सुभाष गायकवाड
श्री.सचिन मधुकर सूर्यवंशी
सौ.विठाबाई नथू पारधी
श्री.बाबाजी गोकुळ ठाकरे
सौ.शोभा समाधान शिंगाडे
सौ.सुलोचना साहेबराव भोसले
श्री.दादाजी दशरथ सुरंजे
सौ.शोभा दादाजी निकम
श्री.उपेंद्रसिंग नारायण सोळुंके
सौ.नंदा रविंद्र उशिरे
१)श्री.रणजीत वाघ (ग्राम महसूल अधिकारी)
२)श्री.वाल्मिक जावरे (महसूल सेवक)
३)श्री.बिजुनाथ पंडित पवार (पोलीस पाटील)
४)श्रीमती.बोरसे (कृषि सहाय्यक)
५)श्री.संजय गोरे,देविदास सुर्यवंशी (बी.एल.ओ.)